✅UPSC / MPSC : त्या पूर्वीच पिक अप घ्या, हीच योग्य वेळ आहे...

  सर्वाना नमस्कार.
तुम्ही सर्वजण अधिकारी बनण्याच्या ध्येयाने या क्षेत्राकडे वळला आणि आज पर्यंत टिकून आहात. (अर्थात मी नेहमी सिरीयस उमेदवारांबद्दलच बोलत असतो हे ध्यानात घ्या.) केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी म्हणतात त्याप्रमाणे “आता आपणास यापुढे करोना सह च जगावे लागेल.” तुमचा अभ्यास कसा ही असो, मात्र तुम्हाला एवढी तरी कल्पना असेलच की, ही गोष्ट तुम्हाला देखील आता पटली असेल. पण आपल्या ध्येयाचं काय? तिथे ही वास्तविकता स्वीकारली आहे का? या प्रस्तावानेचं कारण असे की, माझ्या संपर्कातील “काही क्षमता असणारे उमेदवार” मला नक्कीच लूज पडल्याचे जाणवत आहे. हे बघा, आज आपण २१ व्या शतकात जगत आहोत. करोना आला. त्याने आपला कटू ठसा उमटवला. पण मानवी जीवनाचा इतिहास पाहता हे जगणं थांबेल अस वाटतं का? तर याचं उत्तर निसंकोचपणे नाही असेच कोणीही बोलेल. जर जगणं थांबणार नसेल तर मग या स्पर्धा परीक्षा कशा बर थांबतील? हो, थोडा फार संथपणा जरूर जाणवेल. पण सारं काही शून्य नक्कीच नाही होणार. हे फक्त मनाला पटून नाही चालणार. ते जाणून घेवून त्याप्रमाणे कृती  करणारा यातून नक्कीच तरून जाईल. हे मी ही सांगण्याची अजिबात गरज नाही. हे लिहिणं आणि समजून घेणं खूप सोपे मात्र त्यावर काम करणे च अवघड. यावर जरूर चिंतन कराल अशी अपेक्षा.
                                                                                                     आता मुद्द्यावर येतो. UPSC आपली भूमिका 5 जून ला मांडेल. परीक्षेच्या तारखा जाहीर होतील की नाही माहित नाही पण भूमिका तरी मांडली जाईल. त्यानंतर MPSC आपली भूमिका मांडण्याची जास्त शक्यता वाटते. मी माझ्या अनुभवाच्या आधारे येथे इतकच सांगू इच्छितो की, काही तरी हालचाल जरूर होईल. त्या दृष्टीने ऑगस्ट महिना क्रुसिअल ठरू शकतो. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे २/३ महिने केला अभ्यास आणि आले नाव अंतिम यादीत. असं कधीच कधीच घडत नाही. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात निरंतर तयारीला अनन्य साधारण महत्व असते. सबबी सांगणारा साधी प्री देखील काढू शकत नाही. पुढचं सोडाच. मग सबब अशी ही असो की, “ सर, परीक्षांच्या तारखा समोर नसल्याने हे असं होतं.” असं म्हणणारे अंतिम यादीचे दावेदार नव्हते आणि कधीच नसतील. अस माझं ठाम मत आहे. आज हे लिहिलं कारण मला ज्यांचेवर विश्वास होता ते ही आज संथ झाल्याचे दिसले. त्यावेळी खूप वाईट वाटते.  त्यांनी नंतर मधूनच उठून कृपया माझेशी संपर्क नकाच करू. मला प्लीज गृहीत नका धरू.

माझे जुने जे विद्यार्थी अधिकारी झाले आहेत त्यांचा  अलीकडे मला नेहमी एक प्रश्न असतो  की, “सर तुम्ही तुमचा इतका किमती वेळ बाहेरच्यांना  असा फुकट का देता? त्यांना तुमचं महत्व आहे का? असेल का?” त्याचं उत्तर मी त्यांना कधीच नाही दिलं. इथे ही नाही देणार पण इतकच सांगू इच्छितो ; हिंट म्हणा फार तर की, माझा चांगुलपणावर विश्वास आहे. एक दोन स्वार्थी असतात पण म्हणून सगळेच तसे नसतात. हो, देतो किंमती वेळ. पण म्हणून मी हवा तेव्हा उपलब्द असेन अस नका मानू , चुकीचा अर्थ नका काढू. पुन्हा सांगतो गृहीत नका धरू. असो.

परीक्षांच्या तारखा यथावकाश जाहीर होतील. त्यावेळी हौशे, नवशे, गवशे सगळेच आपापल्या कोशातून बाहेर येतील. धावपळ करू लागतील. त्यावेळी सारेच जागे होतील. उरला प्रश्न आजपर्यंत रडत, कण्हत  का होईना परंतु या अवघड स्थितीमध्ये ही  करत राहिले त्यांचा. आता हळू हळू जनजीवन सुरळीत होत असताना, “करोना सह जगणे” या  विचाराची जाणीव पुढे येत असलेल्या काळात तग धरून असलेल्या  स्पर्धकांनी स्वत:ला थोडं हटकून आता पिक अप घेणेची हीच योग्य वेळ आहे.

Post a Comment

0 Comments