PSI physical आणि interview असा होतो... !!!


Psi मुख्य चा निकाल लागल्यानंतर साधारण 2-3 महिन्याच्या कालावधीनंतर physical घेतली जाते(परंतू सध्या आयोगाने psi physical चे सर्व timetable बिघडवून ठेवले आहे त्यामुळे मुख्य झाल्यानंतर एक वर्ष लागत आहे physical घेण्यासाठी)तर physical हे विभागानुसार घेतले जाते. संपूर्ण विभागाचे physical संपण्यासाठी जवळपास अडीच ते तीन महिने कालावधी लागतो.जी मुले नेमकी psi physical च्या काळात injured होतात त्यांना तसे आजारी असल्याचे प्रमाणपत्र ज्या दिवशी त्यांचे physical आहे त्या दिवशी तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टर्स ना सादर करावे लागते.डॉक्टर्स हे सर्व प्रमाणपत्र पडताळून पाहतात व योग्य वाटल्यास संमती दिली जाते व त्यांचे physical सर्व विभागाचे physical संपल्यानंतर 15 दिवसांच्या गॅप नंतर घेतले जाते.यावेळी कोणतेही कारण चालत नाही.physical हे मुले आणि मुली यांचे वेगवेगळे घेतले जाते.physical हे साधारणतः उन्हाळा आणि पावसाळ्यात घेतले जात नाही.

आता आपण मुलांचे physical कसे असते ते पाहू.एका batch ला जवळपास 40 मुलांचे physical घेतले जाते.ज्या दिवशी तुमचे physical असेल त्यादिवशी सकाळी सहा वाजता तुम्हाला ग्राउंड वर उपस्तिथ राहावे लागते.त्यानंतर तुमचे admitcard वगैरे तपासणे ही औपचारिकता पूर्ण केली जाते.त्यानंतर साधारणतः पहिल्यांदा running (50marks) त्यानंतर गोळाफेक (15 मार्क्स)त्यानंतर pullups(20मार्क्स)व शेवटी लांब उडी(15मार्क्स)असे event घेतले जातात.या total 100 मार्क्स पैकी तुम्हाला जर 50+ मार्क्स मिळाले तरच interview देता येतो.या सर्व event वेळी तुम्हाला एक demo दाखविला जातो कि कोणता event कसा केला पाहिजे.यातील सर्वात महत्वाचा event म्हणजे running जी 2:30 min मध्ये 800m करायची असते.या वेळेत आलात तर 50 मार्क्स मिळतात त्यानंतर प्रत्येक 10sec उशिरा  ला 6मार्क्स कमी होत जातात.लांब उडी या event मध्ये एकदा fall झाला तर चालतो.दुसर्यावेळी झाला तर zero मार्क्स मिळतात.सर्व event झाल्यावर तुम्हाला तुमचा एकत्रित score सांगितला जातो.physical नंतर लगेच 1तासाच्या च्या गॅप ने interview घेतला जातो.त्यावेळी एका हॉल मध्ये सर्वांचे सर्व documents check केले जातात व त्यातील biodata ची एक कॉपी interview पॅनल ला दिली जाते.interview ला बोलावताना सर्वात कमी वय आहे त्यांना पाहिलांदा व जास्त वय त्यांना शेवट या प्रमाणे बोलावले जाते.interview पॅनल मध्ये आयोगाचे  अध्यक्ष व एक ips अधिकारी असतो(हे दोघे तुमचे physical चालू असताना पण तेथे उपस्तिथ असतात)अध्यक्ष हे तुमच्या पॅनल चे अध्यक्ष असतात व ते  biodata वर म्हणजे शिक्षण, तुमची आवड तसेच चालू घडामोडी यावर प्रश्न विचारतात तर ips अधिकारी हे कायदे यावर factual माहिती विचारतात.interview साधारण 15-20min चालतो.अशाप्रकारे सर्व प्रक्रिया झाल्यावर एक ते दीड महिन्यामध्ये final result लावला जातो.

📚अभ्यास पूर्व चा करू कि मुख्य चा?


परीक्षेची नेमकी तारीख माहित नसल्याने बरेच विद्यार्थी अशा मनस्तीतीत आहेत कि अभ्यास पूर्व परीक्षेचाच करत राहू कि मुख्य परीक्षेचा करून घेऊ.

इथे आपण संयुक्त पूर्व परीक्षेचा विचार करूयात PSI पोस्ट चा विचार केलात तर या पोस्ट च्या जागा जास्त असल्याने तुलनेने cutoff कमी असतो. त्यामुळे ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी आहे आणि target हे फक्त psi होयच हेच आहे  त्यांनी psi mains चा अभ्यास केला तरी चालेल.ज्यांना अनुभव नाहीये किंवा आत्ताच mpsc study चालू केला असेल तर त्यांनी फक्त पूर्व परीक्षेवरच लक्ष केंद्रित करावे. STI आणि ASO पोस्ट चा विचार करायचे झाल्यास या पोस्ट च्या जागा कमी असल्याने cutoff जास्त जातो. जे विद्यार्थी या पोस्ट चा अभ्यास करत आहेत त्यांना मी सांगेल कि याआधी ज्यांनी sti, aso ची मेन्स दिली आहे व ज्यांना  गेल्या वर्षी केवळ 2-3 मार्क्स कमी पडल्याने  ने sti, aso पूर्व परीक्षा पास होता आले नाही त्यांनीच केवळ मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा. बाकी मुलांनी पूर्व परीक्षाच पूर्ण ताकदीने करावी.

शेवटी एकच लक्षात घ्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला जवळपास 3लाख एवढ कॉम्पिटिशन आहे तेच मुख्य परिक्षेत केवळ 1हजार असणार आहे.लेख आपल्या मित्रांशी share करायला विसरू नका. भेटूयात पुढील लेखात.धन्यवाद. 🙏

✏️

Post a Comment

0 Comments