CSAT भीती आणि अभ्यास... !!!


💠CSAT या विषयात इंजिनीरिंग झालेल्या मुलांना जास्त गुण मिळतात व आर्टस् झालेल्या मुलांना कमी गुण मिळतात कारण त्यात असलेल्या maths मुळे असा एक समज सर्वत्र आढळतो. हे अगदी चुकीच आहे, इंजिनीर असलेल्या अथवा science background मुलांना जास्त गुण मिळतात हे जरी खर असल तरी ते कशामुळे हे लेखात शेवटी सांगतो.

CSAT या विषयात प्रश्न असतात 80.जवळपास 50 प्रश्न हे उताऱ्यांनवर असतात म्हणजे प्रश्न आणि उत्तर एकाच ठिकाणी म्हणजे इथे आर्टस् झालेला असो अथवा सायन्स कोणालाही आपण कशातून graduat झालो त्याचा फायदा मिळणार नाही. 5 प्रश्न असतात निर्णय क्षमतेवर येथेही वरील प्रमाणेच  graduation कशातून केला याचा येथे काही संबंध नाही.

आता राहिले 25 प्रश्न त्यातील सुमारे 10 प्रश्न असतात बुद्धिमतेवर येथे केवळ साध लॉजिक आणि commen sence वापरायचा असतो जे कि आर्टस् आणि  science वाले समान वापरू शकतात. 5 प्रश्न असतात ते विधाने आणि गृहीतके अशा type मध्ये इथेपण दोन्ही field ला समानच चान्स आहे. आता उरले 10 प्रश्न जे कि अंकगणित म्हणजेच aptitude वर असतील इथे काही प्रश्न science विद्यार्थी लवकर सोडवू शकतात. आर्टस् वाले पण थोडे जास्त efforts घेऊन हे प्रश्न लवकर सोडवू शकतात. इथे एक गोष्ट लक्षात घ्या जरी अंकगणित/बुद्धिमत्ता वर 25 प्रश्न असले तरी कोणी सर्व प्रश्न सोडवत नाही. जो मुलगा काठावर पूर्व परीक्षा पास होतो त्याने या 25 प्रश्नांपैकी 15-18 एवढेच प्रश्न सोडविले असतात त्यातही काही चुकतात.

यावरून अस लक्षात येते कि जरी तुम्ही आर्टस् चे असाल आणि अगदीच aptitude(10 प्रश्न) येत नसेल तरी तुमच्या हातात 15 प्रश्न असतात आणि पास होणार्याने तेवढेच सोडविलेले असतात म्हणजेच तुम्हीपण नक्कीच पास होवू शकता cutoff197 लागला तर 197 मिळणाराही पास असतो आणि 250 मिळनारापण. म्हणजे जरी आपल्याला aptitude अवघड जात असेल तरी 70 प्रश्न हातात असल्याने आपण सहज पास होऊ शकतो.

आता मग इंजिनीरिंग झालेल्या मुलांना मार्क्स कसे जास्त मिळतात... तर त्याचे कारण आहे ते उतारे english मध्ये सोडवितात. एक गोष्ट स्पष्ट सांगतो english मधून उतारे सोडविले तर बरोबर येण्याचे chances जास्त असतात. उतारे सोपेच असतात त्यांना अवघड बनविते आपली marathi language. English उताऱ्यामध्ये उत्तर अगदी एकाच line मध्ये दिलेले असते तेही शब्दांची फेरफार न करता. उतारे हे english मधून मराठीत ट्रान्सलेट केलेले असल्याने त्यातील शब्दांचा sequence बदलतो आणि अनेक अर्थ प्राप्त होतात त्यामुळे मग उतारा अवघड वाटू लागतो.

शक्य असल्यास उतारे english मध्ये सोडविण्याचा प्रयत्न करावा (i know हे अवघड जाईल मात्र सवय लावून घ्यावी लागेल) नसेल जमत तर उत्तर शोधताना मराठी आणि english असा दोन्हीचा आधार घ्यावा म्हणजे उत्तर चुकणार नाही.

आणखी एक गोष्ट म्हणजे उगी भरमसाठ उतारे सोडविण्यात काही अर्थ नाही केवळ आयोगाचे मागील उतारे पहा आयोग प्रश्न कसा विचारते आणि त्यांना अपेक्षित उत्तर काय एव्हड्याचीच प्रॅक्टिस करा score नकीच छान येईल तुमचा. लेख मित्रांशी share करत चला. भेटूयात पुढील लेखात. धन्यवाद🙏

Post a Comment

0 Comments