Jahirat lekhan in Marathi - जाहिरात लेखन मराठी मध्ये

Jahirat lekhan

 ( जाहिरात लेखन )  

' जाहिरात ' या शब्दातच तिचा अर्थ सामावलेला आहे . इंग्रजीत ' जाहिरात साठी Advertisement हा शब्द आहे . यातील ' Ad ' चा अर्थ कडे ' आणि ' verfo ' चा अर्थ ' वळणे ' किंवा ' लक्ष वेधून घेणे ' असा आहे . म्हणूनच लोकांचे लक्ष एखादया गोष्टीकडे वेधून घेते ती जाहिरात होय . यादृष्टीने विविध क्षेत्रांतील निर्मित वस्तु , उत्पादने यांची ग्राहकाकडून मागणी निर्माण करणारी Jahirat lekhan Marathi  ही एक कला आहे .

Jahirat lekhan in Marathi - जाहिरात लेखन मराठी मध्ये

Jahirat lekhan in Marathi 

जाहिरात लेखन मराठी मध्ये


    आजच्या संगणक  व माहिती - तंत्रज्ञानाच्या युगातील इंटरनेट व मोबाइल क्रांतीमुळे जाहिरातक्षेत्राची कक्षा अधिक विस्तारत चालली आहे .

               कला , क्रीडा , शिक्षण , आरोग्य , व्यापार , दळणवळण , प्रसारमाध्यम , मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रात जाहिरातीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे . म्हणूनच ' युग ' आहे जाहिरातींचे ... ' असे म्हणणे वावगे ठरणार नाही .

           जाहिरात क्षेत्रातील भाषेचा वापर जाहिरात हा संदेश स्वरूपाचा संवाद असतो आणि कोणत्याही संवादाचे महत्त्वाचे माध्यम हे भाषा हेच असते . यादृष्टीने जाहिरात लेखनात भाषा ही पुढीलप्रमाणे महत्त्वाची ठरते

. • जाहिरातीची भाषा


( १ ) आकर्षक मजकूर .
( २ ) साधी , सोपी , सरळ , आकर्षक व स्पष्ट भाषा .
(३ ) बुद्धीला फारसा ताण न देणारी .
 ( ४ ) ग्राहकाच्या मनात विश्वासार्हता निर्माण करणारी .
 ( ५ ) शब्दांचा गैरवापर न केलेली .
( ६ ) लोकभावनांची जोड असलेली .
 ( ७ ) वेचक , अर्थपूर्ण , प्रसन्न व परिणामकारक असावी .
( ८ ) लयबद्ध व वाचकांशी सुसंवादी असावी .
 ( ९ ) विनोदाची झालरही असावी .
 ( १० ) मानवी भावभावनांची संवेदनशीलता जाणणारी व जपणारी असावी .

      उदाहरणादाखल जाहिरातीचे काही नमुने आपण पाहिले , तर त्यातून जाहिरातकलेची विविध रूपे आपल्या लक्षात येऊ शकतात.

 जाहिरातीसाठी अनेक माध्यमे :-

 • इंटरनेट
 •  चित्रपट
 •  वृत्तपत्रे
 •  मासिके
 •  आकाशवाणी
 •  दूरदर्शन
 वस्तूंची मागणी निर्माण करण्याची ही कला म्हणजे जाहिरात

जाहिरात  तयार करतांना लक्षात घ्यायच्या बाबी :- 

 • मथळा 
 • उपमथळा
 • तपशील
 •  कंपनीची मुद्रा 
 • कंपनीचे नाव 
 • कंपनीचा पत्ता 

लोकांच्या मनात एखाद्या वस्तूविषयी अावड निर्माण करणेहा  जाहिरातीचा हेतू.


1) जाहिरातीचा मथळा :-

 सुभाषित , उखाणा , संतवचन किंवा तशा प्रकारची रचना

2) बोधचिन्हाचे महत्त्व :-

वस्तूची ओळख , उत्पादकाची ओळख

3) जाहिरातीची आकर्षकता :-

छायाचित्रे , घोषवाक्य ,  मुद्रा

जाहिरातलेखनाच्या मूल्यमापनाच्या कृती.

1)  शब्दांवरून जाहिरात लेखन.
2)  जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडविणे.
3) विषय देऊन जाहिरात लेखन.
4)  दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन

जाहिरात लेखन नमुनाहे जाहिरात लेखन तुम्हाला परीक्षे मध्ये विचारले जाते 10 वी किवा 12 मध्ये 4 किंवा 8 मार्क्स लां विचारले जाते .या लेख च्या मदतीने तुम्ही चांगले मार्क्स घेऊ शकता . 

Jahirat lekhan in Marathi for class 9th class
Jahirat lekhan in Marathi for class 10th class


Post a Comment

0 Comments